आज्जीची पाणीपुरी!! पुण्यातील या पाणीपुरीला तोडच नाही, घरगुती पाट्यावरच्या पाणीपुरीची रंगली जोरदार चर्चा…

पुणे : ऐतिहासिक शहर म्हणून पुण्याची एक आगळी वेगळी ओळख आहे. येथील ऐतिहासिक वास्तू, संस्कृती, खाद्य संस्कृती, पुणेरी भाषा आणि पुणेरी पाट्या नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात.
पुण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दर दिवशी व्हायरल होत असतात. सध्या असाच एका पुणेरी आजीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजी पाणी पुरी विकताना दिसत आहे.
या आजीने तिच्या स्टॉलचे नाव सुद्धा “आजीची पाणीपुरी” असे ठेवले आहे. तुम्ही या आजीची पाणीपुरी खाल्ली का? जर नाही तर तर हा व्हिडीओ नक्की पाहा.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक पाणी पुरीचा स्टॉल दिसेल. या स्टॉलवर एक आजी अप्रतिम अशी भेळ बनवताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या स्टॉलचे नाव “आजीची पाणीपुरी” असे आहे.
ती या स्टॉलवर पाणीपुरी, शेवपुरी, रगडापुरी, ओली भेळ, महाराष्ट्रीयन भेळ, मटकी भेळ विकते. आजीने स्टॉलवर लावलेल्या बोर्डवर लिहिलेय, “२० वर्षाची परंपरा आजीची पाणीपुरी घरगुती पाट्यावरची पाणीपुरी” त्यानंतर बोर्डवर विविध चाटचे प्रकार आणि त्याच्या किंमती लिहिल्या आहेत. पार्सल सुविधा उपलब्ध असल्याचे बोर्डवर लिहिलेय.
या व्हिडीओवर बॉलीवूडमधील आयकॉनिक गाणं लावलं आहे, “जिंदगी का सफर.. है कैसा सफर..कोई समझा नही, कोई जाना नही” या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “निगडी प्राधिकरण आज्जीची पाणीपुरी आणि भेळ तुम्ही ट्राय केली का?” पुण्यातील या आजीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहेत.