कर्नाटकमध्ये बड्या नेत्यांचे पानिपत, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा पराभव


कर्नाटक : आज कर्नाटक विधानसभेचा निकाल जाहीर होत आहे. यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये काँग्रेस 132 जागांच्या जवळपास पोहचली आहे. तर भाजप (BJP) 63 जागांवर आघाडीवर आहे.

असे असताना कर्नाटकातील हुबळी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा पराभव झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीपासूनच महेश तेंगीनाकाने जगदीश शेट्टर यांना मागे टाकत चांगली आघाडी घेतली.

महेश टेंगीनाका यांना 64910 मते मिळाली. तर शेट्टर यांना 29340 मते मिळाल्याची माहिती आहे.

शेट्टर मागे राहिल्याने त्यांची आणि काँग्रेस समर्थकांची निराशा झाली आहे. लिंगायत समाजातील जगदीश शेट्टर यांनी रविवारी रात्री काँग्रेस नेत्यांची भेट घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, कर्नाटकमध्ये आतापर्यत काँग्रेस आघाडीवर असल्याने कार्यकर्ते आनंदात आहेत. आता राज्यात जवळपास काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, हे ऐतिहासिक बहुमत आहे. त्यामुळे काँग्रेससाठी कर्नाटकातील विजय अतिशय महत्त्वाचा आहे. दक्षिणेतील एकमेव राज्यात भाजपचे सरकार होते, ते सरकारही गेल्यामुळे भाजपसाठी हो धोक्याची घंटा मानली जात आहे.

कर्नाटकमध्ये भाजपने जोरदार प्रचार केला होता. केंद्रीय मंत्री याठिकाणी तळ ठोकून होते. मात्र भाजपचा याठिकाणी पराभव झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!