स्मृतीने मानधनाने लग्न रद्द करताच पलाश मुच्छलने घेतला सर्वात मोठा निर्णय, नेमकं काय काय घडलं?

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाविषयी विविध चर्चा सुरू होत्या.

कारण २३ नोव्हेंबरला होणारे लग्न पुढे ढकलण्यात आल्यानंतर, ७ डिसेंबरला लग्न होईल अशी चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र स्मृतीने७ डिसेंबरच्या दुपारीच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्न रद्द झाल्याची अधिकृत घोषणा करून सर्व चर्चांवर शिक्कामोर्तब केले.

तसेच त्यानंतर काही वेळाने पलाश यानेही त्याच्या अकाऊंटवर लग्न मोडल्याचं जाहीर केलं. तसेच दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलोही केलं. यामुळे मोठी खळबळ माजली.

दरम्यान,२३ तारखेला होणार लग्न पुढे ढकलल्याचं जाहीर केल्यावर काही दिवसांनीच स्मृतीने लग्नाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले होते.आणि काल तिने लग्न मोडल्याचं स्टेटमेंटही दिलं. त्यानतंर लगेच पलाशनेही निर्णय जाहीर केला तसेच प्रपोजल व्हिडीओ आणि त्याने वर्ल्ड कपचे सर्व फोटोही डिलीट केले, त्यामध्ये स्मृतीच्या नावाचा टॅटू यांचा समावेश होता.
मात्र असं असलं तरी स्मृतीच्या वाढदिवसाचा एक फोटो त्याच्या अकाउंटवर आहे. तर स्मृती मानधना हिने तिच्या फीडमधून पलाशसोबतच्या सर्व पोस्ट पूर्णपणे काढून टाकल्या आहेत.तसेच त्याची बहीण पलक मुच्छल हिलाही तिने अनफॉलो केलं आहे.
स्मृती मानधनासोबतचे लग्न मोडल्याचे सार्वजनिक झाल्यानंतर पलाश मुच्छलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून लग्नापूर्वीचा प्रपोजल व्हिडिओ डिलीट केला. हा तोच व्हिडिओ होता ज्यामध्ये पलाशने क्रिकेट स्टेडियममध्ये अतिशय रोमँटिक पद्धतीने स्मृतीला प्रपोज केले होते.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्या मैदानावर भारतीय महिला संघाने वर्डकप जिंकला, तिथेच पलाशने स्मृतीला प्रपोज केलं होतं, मात्र आता तो व्हिडीओ पलाशच्या अकाऊंटवरून हटवण्यात आला आहे. काल त्याने हा व्हिडीओ डिलीट केला नव्हता, तेव्हा अनेकांनी त्याला ट्रोल करत, कमेंट्स करत आता तरी तो व्हिडीओ काढ भावा, अशा कमेंट्स केल्या होत्या.
नंतर पलाशने प्रपोजलचा हा व्हिडीओ हटवला. एवढंच नव्हे तर त्याने वर्ल्डकप सेलिब्रेशनचा एक व्हिडीओही काढून टाकला. हे पाहताच सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला, पण पलाशने अद्याप स्मृतीसोबतचे बरेच फोटो आणि पोस्ट डिलीट केलेले नाहीत. त्याच्या वाढदिवसाचा एक व्हिडीओ अजूनही त्याच्या वॉलवर आहे, ज्यात त्याच्यासोबत स्मृी ही देखील दिसत आहे.
