पाकिस्तान डबघाईच्या मार्गावर! देशात पेट्रोलच्या दरात तब्बल 50% वाढ, उडाला महागाईचा भडका..


नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणावामुळे केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तानही मोठा धमाका झाला आहे. युद्धाच्या सुरुवातीपासून पाकिस्तानात पेट्रोलची किंमत आता 378 रुपये प्रति लिटर झाली आहे तर, आतापर्यंत इंधन दरात 50 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे.

आता सरकारने डिझेल आणि पेट्रोलच्या ग्राहक किमती वाढवल्यानंतर अवघ्या एका दिवसानंतरच पाकिस्तान सरकारने पेट्रोलच्या दरात 80 रुपये कपात केली आहे. संयुक्त अरब अमिरातीकडून ‘मित्र’ पाकिस्तानवर लाखो कोटींच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी दबाव वाढला आहे. संयुक्त अरब अमिरातीने पाकिस्तानला 2 अब्ज डॉलर्सचे कर्ज एप्रिलपर्यंत परत करण्यास सांगितले आहे.

युद्धामुळे युएई आपला निधी परत मागत असताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. व्यवहारांचा समतोल स्थिर ठेवण्यास मदत करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीने पाकिस्तानला निधी दिला होता, आणि अलीकडेपर्यंत युएईकडून कर्जाचे रोल ओव्हर केले जात होते. यामुळे पाकिस्तान समोर अजून संकट उभे राहिले आहे.

संयुक्त अरब अमिराती कर्ज परतफेडीचा कालावधी वारंवार वाढवत होती. ही अनिश्चितता संपवण्यासाठी पाकिस्तानी सरकारने संपूर्ण कर्ज एकाच वेळी फेडण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याची प्रकियाही निश्चित झाली आहे. 11 एप्रिल रोजी 450 दशलक्ष डॉलर्स, 17 एप्रिल रोजी 2 अब्ज डॉलर्स आणि 23 एप्रिल रोजी 1 अब्ज डॉलर्स परत केले जातील.

दरम्यान, या कर्जापैकी 1996-97 मध्ये 450 दशलक्ष डॉलर्स घेतले होते, जे मूळतः फक्त एका वर्षासाठी होते, परंतु गेल्या 30 वर्षांत विविध सरकारांनी वारंवार रिन्यू केले आहे. गेल्या महिन्यात इराण-इस्रायल आणि अमेरिकेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर रियाधमध्ये इस्लामिक देशांची एक बैठक झाली ज्यामध्ये इराणने आखाती देशांवर केलेल्या हल्ल्यांचा निषेध केला गेला पण त्याचबरोबर अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांचाही निषेध केला गेले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!