आमचा कोणत्याही जातीला आरक्षण देण्यास विरोध नाही, आमच्या आरक्षणालाही कोणाचा विरोध नको !


पुणे : मराठ्यांनी कधीच कोणाची जात शोधली नाही. मराठा समाजानं प्रत्येकाला आधार देण्याचं काम केलं आहे. मराठा समाजाने कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला विरोध केला, मराठा आरक्षणाला विरोध करु नये असे आवाहन पुण्यातील खराडी येथील सभेत मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

जरांगे पाटील म्हणाले, कोणाला आरक्षण मिळाले म्हणून आम्ही ‘ब्र: शब्द काढला नाही. पण आता ही शेवटची संधी आहे. आम्हाला आरक्षण हवं आहे.

आमच्या स्वतःच्या हक्काच आरक्षण दुसऱ्याला दिलं. ७० वर्षे आमची आरक्षणाविना गेली. पण आम्ही दुसऱ्यांच्या आरक्षणाला देऊ नका, असं म्हटलं नाही. आरक्षण सगळ्यांना देऊ दिलं. सगळ्यांसाठी माझ बांधव उभा राहिला.”अशी खंत देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

“आम्ही सगळ्या समाजाला सढळं हाताने मदत केली. आम्ही आरक्षण देताना कधीच मागे पुढे बघितलं नाही आणि आजही दुसऱ्यांना मदत करताना आमचा हात मागे पुढे सरकत नाही. माझ्या समाजाचा विश्वास प्रबळ होता. आम्ही देशात कधीच कुणाला कमी पडू दिला नाही. सगळ्या जातीतल्या लोकांना मदत करणारा हा समाज आहे. कुणावर संकट आले तर छातीचा कोट करून आम्ही थांबलो.कधीच कुणाला कमी लेखलं नाही. जातीवाद न करण्याचा संस्कार दिला. त्याच पावलावर पाऊल ठेवत आपण पुढे जात आहोत. आमच्या हक्काच्या आरक्षणाची मागणी करत आहोत”, असेही यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!