मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर..

बीड : गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून सीआयडीने अनेकांची चौकशी सुरु केली आहे. यामध्ये अनेकांची नावे समोर येत आहेत.
तसेच याप्रकणी आता घडामोडींना वेग आला आहे. याप्रकणी आता मोठी माहिती समोर आली आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडातील फरार असलेल्या आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालकांना दिले आहेत.
दरम्यान, त्याचबरोबर बंदुकीसोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील, तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, अशाही सुचना बीड पोलिस अधीक्षकांना देत तातडीने फेरआढावा घेण्य़ाचा आदेश दिला आहे.
तसेच या प्रकरणात आरोप होत असलेले वाल्मिक कराड फरार आहेत. वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये ते अद्याप फरार असल्याने त्यांच्या शोध घेण्यासाठी सीआयडीने वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची चौकशी केली आहे.
याबाबत वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील होत आहे. याबाबत दोन ते अडीच तास मंजिली कराड यांची चौकशी केली आहे. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं आहे. यामुळे बीडचे वातावरण तापलं आहे.