उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू! पहिल्याच दिवसापासून विरोधक ‘या’ विषयावर आक्रमक होणार..
मुंबई : राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांनी सरकारमध्ये जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अशातच आता अधिवेशन सुरू होत आहे.
उद्या पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या आक्रमकतेपुढे शिंदे सरकारची कसोटी लागणार आहे. यामध्ये राज्यात सध्या महिला अत्याचाराचे वाढते प्रकार, कोयता गेंग, ढासळती कायदा व सुव्यवस्था, मंत्र्यांचे वाढते भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी यावर काँग्रेस नेते आक्रमक होणार आहेत.
यामुळे राज्यात पाऊस नसला तरी विधिमंडळ अधिवेशनात शिंदे सरकारच्या मंत्र्यांची विरोधकांकडून धुलाई होणार आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फूट पाडून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह ९ जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.
यामुळे विधानसभेत विरोधकांची ताकद कमी झाल्याचे दिसत असले तरी ठाकरे गट राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस या महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांच्या एकजुटीमुळे विधिमंडळ अधिवेशनात शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला संरक्षण आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर शिंदे गटाची कसोटी लागणार आहे.