अजितदादा आणि जाचकबापूंच्या विरोधात विरोधक एकवटले! तानाजी थोरात आणि घोलप गटाने केली मोर्चेबांधणी, उमेदवार यादी जाहीर…

भवानीनगर : पुणे जिल्ह्यातील महत्वाचा असलेला छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आज शेवटच्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या. आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी चेअरमन पृथ्वीराज जाचक यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर बाकीचे विरोधक एकत्र आले.
यामध्ये घोलप गट, तसेच तानाजी थोरात, निंबाळकर यांनी एकत्र येत छत्रपती बचाव पॅनलची घोषणा केली. यामध्ये गट नं. १ लासुर्णे १) श्री. संजय सोमनाथ निंबाळकर, २) श्री. प्रताप मोहन पवार, गट नं. २ सणसर, १) संग्राम दत्तात्रय निंबाळकर २) अभयसिंह विठ्ठलराव निंबाळकर
गट नं. ३ उध्दट 1. करणसिंह अविनाश घोलप, 2. तानाजी साहेबराव थोरात गट नं.४ अंथुर्णे, १) श्री. राजेंद्रकुमार बलभिम पाटील २) श्री. बाबासो भगवान झगडे गट नं.५ सोनगांव १) श्री. रविंद्र भिमराव टकले
गट नं. ६ गुणवडी १) श्री. नितीन अशोक काटे ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन १) श्री. सत्यजीत भाऊसाहेब सपकळ, अनुसूचित जाती/जमाती, १) श्री. बाळासो उर्फ भाऊसो गुलाब कांबळे
महिला राखीव १) सौ. सिता रामचंद्र जामदार २) सौ. पद्मजा विराज भोसले इतर मागास प्रवर्ग, १) श्री. संदिप वसंतराव बनकर, भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास १) श्री. तुकाराम गणपत काळे