पुणे जिल्ह्यातील शरद पवार गटाचे एकमेव आमदार अजित पवारांच्या भेटीला, शरद पवारांची साथ सोडणार?


पुणे : पुणे जिल्ह्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे एकमेव आमदार बापू पठारे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या असून ते शरद पवार गटात झाला का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. नुकतीच वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांनी अजित पवार यांची भेट घेतली.

आमदार पठारे आणि अजित पवार यांची भेट होताच याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. याबाबत आमदार पठारे म्हणाले, अजितदादा यांच्या या भेटी दरम्यान, मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात चर्चा केली. काही कामे होती प्रश्न होते, असेही त्यांनी सांगितले आहे.

तसेच ते म्हणाले, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर बापू पठारे हे शरद पवार यांच्या गटात राहिले. विधानसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तिकीट देण्यात आले. यामध्ये पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार म्हणून ते निवडून आले.

त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांचा पराभव केला. यामुळे याची जोरदार चर्चा झाली होती. इतर अनेक ठिकाणी अजित पवार यांनी विजय मिळवला. यामुळे अजित पवारांनी आपली ताकद दाखवून दिली होती. राज्यात विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला केवळ दहा जागांवर विजय मिळाला.

तसेच अजित पवार यांनी दमदार कामगिरी केली. त्यांच्या पक्षाला ४१ जागांवर यश मिळाले. यामुळे आता अजित पवार यांच्याकडे अनेक आमदार भेटीसाठी जात आहेत. येणाऱ्या काळात अनेकजण त्यांच्या गटात प्रवेश करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!