लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम हे फक्त पत्रकार करु शकतात; न्यायिक व्यवस्थेवर विश्वास कमी झाल्याचे ज्येष्ठ विधिज्ञ असिम सरोदे यांचे भाष्य …!

उरुळीकांचन : लोकशाहीचे खरे रक्षक पत्रकार हेच असून भावनिक होऊन पत्रकारिता करण्यापेक्षा कायद्याच्या आधार घेऊन पत्रकारिता करणे आवश्यक आहे.अन्यायग्रस्तांचा आवाज होऊन अन्याय झालेल्या लोकांसाठी मदत पत्रकारितेत असावी असे मत ज्येष्ठ विधिज्ञ असिम सरोदे यांनी व्यक्त केले.

लोणीकाळभोर (ता.हवेली ) येथील एमआयटी विद्यापीठ सभागृहात प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार कार्यशाळा व स्नेह मेळाव्याचे उद्घाटन असिम सरोदे व पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमास पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, हवेली बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, उपसभापती रवींद्र कंद,कृषी उत्पन्न बा.समिती हवेली सदस्य प्रशांत काळभोर, पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर, जिल्हा नियोजन समितीचे माजी संचालक संतोष कांचन, प्रिंट व डिजिटल पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल जगताप, कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे, उपाध्यक्ष राजेंद्र काळभोर, हवेली तालुका अध्यक्ष संदिप बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

असिम सरोदे पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील पत्रकारांची आर्थिक अवस्था सध्या वाईटअसून माध्यमांच्या बदलत्या स्वरूपानुसार त्यांनी देखील स्वतः बदलणे गरजेचे आहे. खऱ्या अर्थाने पत्रकारिता जिवंत ठेवण्याचे काम सध्या फक्त ग्रामीण पत्रकारच करत असून विरोधात वृत्तांकण केल्यास पत्रकारांची बदमानी , दडपण झुगारून पत्रकारांनी सामाजाचे कर्तव्य पेलले पाहिजे. कार्यक्रमात प्रस्ताविक प्रिंट व डिजिटल मेडीया पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष सुनिल जगताप, सूत्रसंचालन संतोष देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळभोर यांनी केले.