ऑनलाईन रमीचा नाद लय वाईट! घरदार, शेती गमावली, झालं 80 लाखांचं कर्ज, सोलापूरमध्ये 26 वर्षांच्या तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त…


सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात राहणारा जय जाधव हा तरुण शेतकरी कुटुंबातून आलेला. तो रमीच्या नशेत इतका गुंतत गेला की, त्याच्यावर सुमारे 80 लाख रुपयांचं कर्ज झालं. जयने रिअल इस्टेट व्यवसायातून कमावलेले 23 लाख, मित्रांकडून घेतलेले 20 लाखांचं कर्ज, दीड एकर शेतजमीन, स्कॉर्पिओ गाडी गहाण ठेवून आणलेले पैसे, सर्व रमी गेममध्ये उडवले.

यामुळे त्यांची चर्चा सुरु झाली आहे. करमाळा येथील जय जाधव या तरुणावर तर या गेमच्या व्यसनापायी 80 लाखांचं कर्ज झालं आहे. रमीच्या नादात अवघ्या 26 व्या वर्षीचं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. यामुळे या गेमचे व्यसन काय काय करू शकते, याचा अनुभव याठिकाणी आला आहे. राज्यात ऑनलाईन जुगार गेम्स वाढत आहेत.

यामध्ये रमी, पोकर, आणि क्रिकेट बेटिंगयांचे व्यसन झपाट्याने वाढत आहे. पुणे, ठाणे, औरंगाबाद, याशहरी भागांपासून ते ग्रामीण भागातील युवकही याच्या आहारी जात आहेत. ऑनलाईन गेमिंगमुळे कर्जबाजारी होणं, आत्महत्या, कौटुंबिक कलह यासारख्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे. यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत कामकाज सुरू असताना ऑनलाईन रमी गेम खेळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर बरीच चर्चा रंगली. पण यातील ऑनलाईन रमी गेमचं व्यसन आणि त्या व्यसनापायी असंख्य तरुण कर्जबाजारी झाल्याचं चित्र आहे. यामुळे यावर बंदी आणणे गरजेचे आहे.

जय जाधव या तरुणावर तर या गेमच्या व्यसनापायी 80 लाखांचं कर्ज झालं आहे. रमीच्या नादात अवघ्या 26 व्या वर्षीचं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तो रमीच्या नशेत इतका गुंतत गेला की, त्याच्यावर सुमारे 80 लाख रुपयांचं कर्ज झालं. अशा अनेक घटना सध्या घडत असून पालकांनी देखील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!