गेमचा नाद लय वाईट! तरुणाने ४० लाख गमावले, जमिनही विकावी लागली.

जालना : सध्या तरुण मुलं ऑनलाइन जुगाराच्या नादी लागून आर्थिक नुकसान करुन घेत असल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी पैसे घालवून ही मुलं पैसे घालवत आहेत. ऑनलाईन जुगाराला बळी पडून आपल्या वस्तू, घरदार, शेती-वाडीही गहाण टाकत आहेत.
जालना जिल्ह्यात असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाने ऑनलाइन गेममुळं तब्बल ४० लाख रुपये गमावले आहेत. यामुळे त्याला जमीनही विकावी लागत आहे. परमेश्वर केंद्रे असे या तरुणाचं नाव आहे.
गेल्या वर्षभरापासून परमेश्वरला मॉस्ट बेट नावाचा गेम खेळण्याची तलफ लागली. ऑनलाइन गेम खेळत असताना सुरुवातीला १००, ५०० आणि हजार रुपयांनी हा गेम खेळायला सुरुवात केली. खेळात नवीन असल्याने सुरुवातीला त्याला पैसेही मिळू लागले.
घरी आरामात बसून मोबाईलवर पैसे मिळू लागल्याने त्यांने खेळात १००, २००, ५०० रुपये गुंतवण्यास सुरुवात केली. पण हळूहळू हे पैसे सगळे डुबत गेले. हजार पाच हजारांचा आकडा कधी लाखांच्या पार गेला हे त्यालाही कळलं नाही. यामुळे घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.