Onion Rate : कांदा दर पुन्हा पेटणार? दरावरून मोदी सरकारला भरली धडकी
Onion Rate : गेल्या काही दिवसांपासून शेतकरी चिंतेत सापडला आहे. तसेच कांदा उत्पादकांसाठी यंदाचे वर्ष आव्हानात्मक ठरले आहे. एप्रिल ते ऑगस्टपर्यंत विक्री केलेल्या कांद्याचा उत्पादन खर्चही निघाला नाही
त्यामुळे आर्थिक कोंडीत अडकलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी कुठलेही पथक आले नव्हते. मात्र आता उन्हाळ कांद्याचा साठा संपुष्टात आला आहे, तर खरीप कांदा हंगाम लांबला आहे.
परिणामी, पुन्हा दर वाढीची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारला धडकी भरली आहे. त्यामुळे कांद्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय समिती अखेर महाराष्ट्रात आली आहे. गत हंगामापासून कांद्याला अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश कायम होता; मात्र केंद्र सरकारने याकडे लक्ष दुर्लक्ष केले. Onion Rate
आता आगामी लोकसभा व विविध राज्यांतील विधानसभा निवडणुका समोर ठेवून कांदा दर नियंत्रणात आणण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. ऑगस्ट महिन्यात दरात सुधारणा होत असतानाच केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केले.
तर ऑक्टोबर महिन्यात वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यातमूल्य प्रतिटन ८०० डॉलर करून अप्रत्यक्ष निर्यातबंदी केली. त्यामुळे एकाच सप्ताहात जवळपास १,८०० रुपयांपर्यंत दरात घसरण दिसून आली आहे. आता आवक कमी होत असतानाच ग्राहकांसाठी केंद्रीय समिती महाराष्ट्रातील कांदा उत्पादक पट्ट्यात दाखल झाली आहे.