Onion Rate : कांद्याच्या दरात मोठी उसळी!! सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा…


Onion Rate : मान्सूनने परतीची वाट धरली आहे. परिणामी तीन -चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने झोडपले आहे. अशातच आता उन्हाळी कांद्याला तेजीची झळाळी मिळत आहे. चाळीसगाव बाजार समितीत झालेल्या लिलावात कांद्याला साडेचार हजारांचा दर मिळाला आहे.

यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्याभरात सातत्याने कांद्याला चढा दर मिळत आहे. मध्यंतरी ४६०० रुपये प्रतिक्विंटल असाही भाव मिळाला होता. कांद्यावरील निर्यात बंदी हटविल्यानंतर घाऊक बाजारात कांद्याच्या दराने उसळी घेतली आहे.

ऐन सणासुदीच्या दिवसांत किरकोळ बाजारात कांदा ६० ते ७० रुपये प्रतिकिलोने विकत घ्यावा लागत आहे. मात्र, उन्हाळी कांद्याची आवक ओसरल्यावर निर्यातीबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जरी भाव वाढले असले तरी, शेतकऱ्यांकडील कांदा आता संपत आला आहे. Onion Rate

त्यामुळे शेवटी मिळालेली ही दरवाढीची झळाळी फारशी लाभदायक नाही, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, कांद्याचे तर प्रति किलो साठ ते सत्तर रुपये किलोंवर पोहोचले आहेत. या महागाईचा मोठा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता असून, गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!