Onion News : ब्रेकिंग! कांद्यावरील किमान निर्यात मूल्य सोबत २० टक्के निर्यात शुल्कही केलं कमी…
Onion News : केंद्र सरकारने कांद्यावरील ५५० डॉलर प्रतिटन किमान निर्यात मूल्य (मिनिमम एक्स्पोर्ट प्राइज) हटवले आहे. त्याचप्रमाणे निर्यात शुल्कामध्ये २० टक्के कपात करीत कांदा उत्पादकांना दिलासा दिला आहे.
केंद्र शासनाने दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रात्री अकरा वाजेच्या दरम्यान पुन्हा नोटिफिकेशन काढून कांद्यावरील किमान निर्यात शुल्क 20 टक्क्याने घटवले आहे. वित्त मंत्रालयाचे उपसचिव अमृता टाइट्स यांनी याबाबतचे नोटिफिकेशन काढले.
नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा बाजारात आल्याने कांद्याचे भाव पडण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत होती. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी, निर्यातदार यांनी कांदा निर्यातीचे शुल्क कमी करण्याची मागणी केली होती.
याचे कारण म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा कांदा भारतीय कांद्यापेक्षा अतिशय कमी दरात जागतिक बाजारपेठेत विक्री होत असल्याने भारतीय कांद्याची मागणी घटली होती. Onion News
दरम्यान, भारत सरकारने कांदा निर्यात बंदी वरील घातलेले किमान निर्यात मूल्य दराची निर्बंध उठविले यानंतरलागलीच दुसरे नोटिफिकेशन काढत कांद्यावरील निर्यात शुल्क २० टक्क्याने घटविल्याने आता त्याचा फायदा कांदा भाव वाढण्यात मोठी मदत होणार आहे. तसेच परदेशी कांदा निर्यातीस व्यापारी वर्गास मोठा वाव मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे
आता कांदा निर्यात करणे सोपे झाले असून, निर्यातीत वाढ हाेईल. त्यामुळे बाजारात नवीन येणाऱ्या कांद्याला चांगला भाव मिळेल. दिवाळीनंतर नवीन लाल आणि रांगडा कांदा बाजारात आल्यावर कांद्याचे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे.