Onion News : कांदा निर्यातबंदीमुळे राज्यात ३ हजार विवाह रखडले, नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या…


Onion News : सध्या कांद्याच्या मुद्यावरुन राज्यातील वातावारण चांगलचे तापले आहे. कारण केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. राज्यात कांदा निर्यातबंदीला रविवारी ७ जानेवारीला महिना पूर्ण झाला.

या निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादकांकडे दमडीही न उरल्याने एकट्या नाशिक जिल्ह्यात महिनाभरात १२०० विवाह होऊ शकले नाहीत, तर राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांचा विवाहाचा आकडा २५०० ते ३ हजार आहे.

या विवाह सोहळ्याच्या तारखा काढून पैशांअभावी पुढे ढकलण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली, शिवाय नवीन कांद्याला भाव नसल्याने महिनाभरात १५०० कोटींचे नुकसान झाल्याचा दावा लासलगाव बाजार समितीचे संचालक प्रवीण कदम यांनी दिली आहे.

केंद्राने ७ डिसेंबर रोजी कांदा निर्यातीवर बंदी आणली. त्याचा फटका नाशिक, सोलापूर, नगर, पुणे, धुळेसह इतर कांदा उत्पादक जिल्ह्यांतील कांदा उत्पादक शेतकरी, बाजार समिती, व्यापारी, निर्यातदार, वाहतूकदार, मजूर, शेड व्यावसायिकांसह इतर घटकांना बसला. Onion News

नाशिक जिल्ह्यात महिन्यातील २४ दिवस बाजार समितीत लिलाव होतात. या २४ दिवसांत निर्यातबंदीनंतर महिनाभरात ५५० कोटींचे नुकसान झाले. याचा फटका कांद्यावर अवलंबून असलेल्या सर्व घटकांना बसला आहे.

तसेच, निर्यात बंदी झाल्यामुळे कांदा उत्पादकांच्या हाती पैसाच आला नाही. साहजिकच या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या विवाहात अडथळे आले. विवाहासाठी मंडप, लॉन्स, हॉल, वाजंत्री, जेवणावळीचा खर्च किमान ५ लाखाच्या तर कमाल २५ लाखांवर खर्च केला जातो, मात्र यावेळी पैसाच नसल्याने शेतकऱ्यांना विवाहाच्या तारखा पुढे ढकलने भाग पडले. आता निर्यात सुरु झाल्यास दोन पैसे मिळतील आणि मार्चनंतर रखडलेले विवाह करता येतील, अशी आशा शेतकरी बाळगून असल्याचे कदम म्हणाले.

दरम्यान, केंद्र सरकारने ७ डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यानंतर घाऊक बाजारात कांद्याचे भाव जवळपास ५० टक्क्यांनी घसरले आहेत. कांदा निर्यातबंदीमुळे कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. यामुळं सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांन या निर्णयाचा मोठा फटका बसत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!