विकला तरी तोटा आणि ठेवला तरी तोटाच! कांद्याने शेतकऱ्यांचा केला वांदा..
मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी उन्हाळी कांद्याची लागवड करतात. कारण या कांद्याला पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु सध्या या कांद्याची मागणी कमी झाल्याचे चित्र आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवलेला कांदा सडू लागला आहे. एकीकडे कांद्याला भाव नाही तर दुसरीकडे कांदा चाळीत सडू लागल्याने शेतकरीवर्ग कमालीचा चिंतेत सापडला आहे.
कांदा चाळीत सडू द्यावा की तो कवडीमोल भावात विकावा असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. सडलेला कांदा बाहेर काढून पुन्हा चाळ भरली तर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे काही दिवसांपूर्वी कांद्याचे भाव वाढले होते. परंतु त्यानंतर पुन्हा हे भाव कोसळले आहे. त्यामुळे यंदाही कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. येत्या काळात जर कांद्याचे भाव वाढले नाही तर शेतकरीवर्गाच्या अडचणी वाढू शकतात.