एका वर्षाच्या मुलाला फाशी दिली, नंतर आईनेही घेतला टोकाचा निर्णय, घटनेने कर्जत हादरलं….

कर्जत : येथील खांडवी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एक वर्षाच्या चिमुरड्याला फाशी देत स्वतः फाशी घेत आईने जीवनयात्रा संपवली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून याबाबत कारण अजून समोर आले नाही. याप्रकरणी आत्महत्या की अजून काही कारण याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
याबाबत माहिती अशी की, खांडवी येथील कुमार परशुराम कांबळे (वय २४) यांचा साक्षी कुमार कांबळे (वय २३) यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना स्वरूप नावाचा एक वर्षाचा मुलगा होता. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेदिवशी पती कुमार दुपारी जेवण्यासाठी घरी आले. त्यावेळी त्यांना दरवाजा आतून बंद दिसला. यामुळे त्यांनी खिडकीतून आत बघितले. मात्र काही दिसले नाही. बराच वेळ दार वाजवून सुद्धा आतून प्रतिसाद न मिळाला नाही. त्यांनी शेजारीच राहत असलेल्या सासूला बोलून आणले.
यावेळी धक्कादायक प्रकार त्यांना दिसला. नंतर खिडकीमधून नीट पाहिले असता त्यांना साक्षी आणि स्वरूप घरातील अँगलला फाशी घेत लटकलेल्या अवस्थेत दिसले. यामुळे त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.यानंतर इतरांना याबाबत माहिती समजली.
दरम्यान, काही दिवसापूर्वी स्वरूपचा पहिला वाढदिवस त्यांनी थाटामाटात साजरा केला. यामुळे नंतर नेमकं काय घडलं याबाबत पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी किशोर कांबळे यांनी खबर दिली आहे. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिल भोसले हे करीत आहेत.