पुण्यात उडाली खळबळ! सिंहगड रोड परिसरात एकाचा डोक्यात सपासप वार करून खून, कारण..

पुणे : पुण्यातील सिंहगड रोडच्या रायकर मळा परिसरात एकाचा खून झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ज्याचा खून झाला तो विद्युत वितरण कंपनीमध्ये कामाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
गोपाळ कैलास मंडवे असे खून झालेल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, गोपाळ मंडवे यांच्या डोक्यात वार करून खून करण्यात आला आहे. खून नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आला आहे हे अद्याप निष्पन्न झालेले नाही. घटनेचा पुढील तपास सिंहगड रोड पोलिस करीत आहेत.
दरम्यान आज सोमवार (ता.४ ) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती सिंहगड रोड पोलिसांना मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील तसेच गुन्हे शाखेतील अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. घटनास्थळी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. सिंहगड रोड पोलिस ठाण्यात याबाबत खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.