साखर कारखान्यांचे एक हजार कोटी परत मिळणार, कारखान्यांना मोठा दिलासा….!
पुणे : साखर कारखादार उद्योगातून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना याबाबतची घोषणा केली आहे. सहकारी साखर कारखान्यांनी ऊस खरेदीपोटी निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा (एफआरपी) दिलेली जादा रक्कम हा नफा नसून, तो त्यांचा व्यावसायिक खर्च म्हणून ग्राह्य धरण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
यामुळे आता कारखान्यांनी आयकराच्या अनुषंगाने यापूर्वी भरलेली दंडाची एक हजार कोटींची रक्कम परत मिळणार आहे. हा प्रश्न गेल्या 30 वर्षांपासून प्रलंबित होता. ती रक्कम आता सहकारी साखर कारखान्यांना परत मिळण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, उसाची वैधानिक किंमत (एसएमपी) आणि उसाच्या रास्त आणि किफायतशीर किंमतीपेक्षा (एफआरपी) शेतकर्यांना दिलेली जादा रक्कम ही साखर कारखान्यांचा नफा समजून आयकर विभागाकडून नोटिसा देण्यात येत होत्या. यामुळे याची भीती सतावत होती.
यामुळे आता आयकराच्या प्रश्नातून सोडवणूक करून केंद्राने मोठा दिलासा दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. आयकर विभागाची सातत्याने आयकराच्या मागणीची टांगती तलवार साखर कारखान्यांवर राहत होती.