धक्कादायक घटना! धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून, पेठ येथील घटनेने खळबळ..

उरुळी कांचन : दिवसागणिक गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहेत.

अशातच आता पेठ (ता. हवेली) येथे अज्ञात कारणावरून येथील एका ६० ते ६२ वर्ष वयोगटातील एका व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीने धारदार शास्त्राने खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हि घटना शुक्रवारी (ता. १९) पेठ-वडाचीवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत म्हसोबा मंदिर परिसरात उघडकीस आली आहे. दरम्यान हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे आणखी स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, संपत चौधरी (वय अंदाजे ६० ते ६२ रा. पानमळा, वडाचीवाडी, पेठ, ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नेमका खून का व कोणी केला याची अद्याप माहिती मिळाली नसून सदरचा खून हा पूर्ववैमन्यासातून झाला असल्याची चर्चा परिसरात आहे.
दरम्यान, घटनेची महिती उरुळी कांचन पोलिसांना मिळताच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे, सहायक फौजदार रमेश भोसले, पोलीस हवालदार प्रवीण चौधर, निलेश जाधव, उद्धव गायकवाड, सुनील सस्ते, रवी फड, अजित काळे, गाडेकर, हे सदर ठिकाणी पोचले असून पंचनामा सुरू झाला आहे.
घटनास्थळी चौधरी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यत दिसून आला. त्यानंतर ही माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. हा खून कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट झाले नाही. त्यानुसार पोलिसांची पुढील कार्यवाही सुरु आहे.
