तिघांनाकडून दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह


उत्तर प्रदेश : शेतातील झाडावर दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आले आहे. हि घटना उत्तर प्रदेशात घटमपूर भागातील एका गावात वीटभट्टीजवळच्या शेतातील घडली आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

वीटभट्टीचा ठेकेदार रामरूप निषाद (४८), त्याचा मुलगा राजू (१८) आणि पुतण्या संजय (१९) यांनी या अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपिंना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी या कृत्याचा व्हिडीओ देखील बनवला होता. त्यामुळे बुधवारी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, आहे. या मुली बुधवारी बेपत्ता झाल्यानंतर संध्याकाळी, त्यांचे मृतदेह वीटभट्टीपासून ४०० मीटर अंतरावर एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले. मृत अल्पवयीन मुली १४ आणि १६ वर्षांच्या आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!