Pune Crime : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; आरोपीला अटक


पुणे : विनयभंग, खून, बलात्कार अश्या घटना सतत पुण्यात घडतच आहे. अशीच एक घटना पहिले लग्न झाल्याचे लपवून ठेवून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापीत करुन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली आहे. हि घटना गुरुवारी (ता.२१) पीडित मुलीच्या राहत्या घरात घडली आहे.

३० वर्षीय तरुणीने गुरुवारी (ता .२१) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दिपक शंकर गायकवाड (वय-35 रा. हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीसोबत गोड बोलून तिच्यासोबत जवळीक साधली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले. मुलीच्या घरी येऊन दिपक याने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

आरोपीने त्याचे लग्न झाल्याचे तरुणीपासून लपवून ठेवले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याचे मुलीच्या लक्षात आले. तिने पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरुद्ध तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी दिपकला अटक केली आहे.

दरम्यान, बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!