अजितदादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या, धक्कादायक माहिती उघड झाल्याने मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती…

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्रावर दुःखाचे सावट आले आहे. विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित दादांच्या अपघाती निधनादिवशीच मंत्रालयात अत्यंत लाजीरवाणी घटना घडल्याचं समोर आलं आहे.

याबाबत माहिती अशी की, अजित दादांनी थांबवून ठेवलेल्या काही फाईल्सवर सुमारे 4 वाजताच्या सुमारास सह्या करण्यात आल्याचे प्रकरण समोर आलं. आता, याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्थगिती देण्यात आली.
अजितदादांच्या निधनाच्या दिवशी अल्पसंख्याक विकास विभागाने 75 शाळांना परस्परपणे अल्पसंख्यांक दर्जाचे प्रमाणपत्र वाटप केल्याचे प्रकरण समोर आले. यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय अधिकार्याकडून करा आणि दोषींवर कारवाई करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दुखवट्याचे वातावरण असतानाच अल्पसंख्याक विभागाकडून चार दिवसांत 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. याबाबत आता चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यामुळे वातावरण तापले आहे. दोषींवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. टाळूवरचे लोणी खाणे ही म्हण इथे लागू पडते. त्यामुळे या घटनेचा आणि सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो, असेही काँग्रेसने म्हटले आहे.