लग्नाच्या पहिल्या रात्री नवरी म्हणाली मी गरोदर आहे!! ते ऐकताच नवरदेवाने उचललं धक्कादायक पाऊल, सगळेच हादरले


उत्तर प्रदेश : लग्नाच्या पहिल्या रात्रीच नववधूने असं सत्य सांगितलं की, नवरदेवाने तिची गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी आरोपी नवरदेव आणि त्याच्या आईला अटक केली आहे. या प्रकरणात अन्य पाच आरोपी फरार आहेत. अटकेनंतर पतीने जो खुलासा केला, त्याने पोलीसही हैराण झालेत. उत्तर प्रदेशच्या बदायूंमधील हे प्रकरण आहे.

नेमकं घडलं काय?

अलापुर गावात राहणाऱ्या यादरामच्या मुलाचा नीरजचा शाहजहांपुरच्या रामनिवास यांच्या मुलीशी २२ जानेवारीला लग्न झाले. ज्या मुलीसोबत लग्न झालं, तिच्यासोबत नीरजचे आधीपासून प्रेमसंबंध होते. नात्यात असल्याने दोघांच लग्न लावण्यात आलं. दोघांमध्ये लग्नाआधीपासून शारीरिक संबंध होते.

पण मुलीने ती गर्भवती असल्याच आधी सांगितलं नव्हते. नीरजने पोलिसांना सांगितलं की, लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीने मला सांगितलं की, ती अडीच महिन्याची गर्भवती आहे, तेव्हा मला धक्का बसला. मला विश्वासच बसला नाही. मी घरच्यांना या बद्दल सांगितले.

कुटुंबिय आणि आसपासच्या लोकांनी टोमणे मारायला सुरुवात केली. बरच काही माझ्याबद्दल बोललं जात होतं. ते मला सहन झालं नाही. त्यानंतर मी आईच्या साथीने पत्नीची गळा आवळून हत्या केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!