ऑन ड्युटी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला कंटेनरने चिरडलं ; उरुळीकांचन येथील मिथुन धेंडेंचा जागीच मृत्यू…!


उरुळीकांचन : ऑन ड्युटी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला एका भरधाव कंटेनरने चिरडलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना जुन्या मुंबई -पुणे महामार्गावरील वडगाव फाटा चौकात घडली आहे. मिथुन वसंत धेंडे (वय ४९, रा. उरुळी कांचन, पुणे) असे मृत्यू झालेल्या वाहतूक पोलिसाचं नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई बाजूकडून चाकणकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनर चालकाने वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाला चिरडलं आहे. मिथुन वसंत धेंडे असं वाहतूक पोलिसाचं नाव आहे. या अपघातात धेंडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.दरम्यान, संबंधित कंटेनर चालकाने वाहतूक नियमांची पायमल्ली केल्यामुळे पुणे ग्रामीण कंट्रोलवरून कंटेनर थांबविण्याचे आदेश झाल्याने कंटेनर थांबवत असताना, भरभाव वेगाने वाहतूक पोलिसाला चिरडलं.

या अपघाताचा तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत. सध्या वडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत काम करणारे मिथुन वसंत धेंडे यांचा काल मंगळवारी (13 मे ) रोजी वाढदिवस होता. त्यांच्या या अपघाती निधनाने मावळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!