‘डिजेचा आवाज आणि कोयत्याचा वार’ अपमान सहन न झाल्याने वृद्धाची आत्महत्या, पुण्यात उडाली खळबळ…

पुणे : पुण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. 70 वर्षीय नागगिरकाने स्पिकरच्या आवाजाला आणि झालेल्या अपमानाला कंटाळून आत्महत्या केली. पुण्यातील येरवडा भागात ही घटना घडली.
ज्ञानेश्वर साळुंखे असे आत्महत्या केलेल्या जेष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
चेतन बेले, देवेश ऊर्फ नन्या पवार, यश मोहिते, शाहरुख खान, जय तानाजी भडकुंभे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आता गौतमी पाटीलसाठी खासदार अमोल कोल्हे मैदानात, म्हणाले, दोन वेळचे जेवण
मिळालेल्या माहिती नुसार, चेतन बेले हा साळुंखे यांच्या घराशेजारी राहायला आहे. त्यांच्या घरात हळदीचा कार्यक्रम सुरू असल्याने स्पीकर लावला होता. स्पीकरच्या आवाजाचा त्रास होत असल्याने ज्ञानेश्वर साळुंखे यांनी त्या ठिकाणी जाऊन आवाज करु नका, आम्हाला त्रास होतो असे सांगितले.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! राज्यातील तब्बल एवढ्या शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर
यामुळे वाद निर्माण झाला. यावरून आरोपींनी त्यांचा अपमान केला आणि हाकलून दिले. त्यांना मारहाण करण्यात आली. मारहाणीमुळे होणार्या वेदना व अपमान सहन न झाल्याने त्यांनी बंडगार्डन पुलावरुन नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.