काल ऑफर, आज मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अर्धा तास बैठक, नेमकी कशावर चर्चा?

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं. या ऑफरनंतर आज उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या दालनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना हिंदीची सक्ती हवीच कशाला हे पुस्तक देखील भेट दिलं. समोर आल्या माहितीनुसार विरोधी पक्षनेते पद, त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्ती या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
विधान भवनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धवजी 2019 पर्यंत काही स्कोप नाही,सत्तेत सहभागी व्हा आपण वेगळ्या पद्धतीने बोलू असं निमंत्रण दिलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असतानाच आज झालेल्या भेटीने तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान दुसरीकडे आजच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. जन सुरक्षा विधेयका बाबतीत महाविकास आघाडी राज्यपालांचे भेट घेण्याच नियोजन करत असून याबाबत चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना येणार असल्याची माहिती समोर आली आहे.