दुष्काळात तेरावा महिना ! वीज ग्राहकांना प्रतियुनिट 2 रुपये 55 पैसे दरवाढीचा प्रस्ताव…!


पुणे : सध्या महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली असताना आता अजून यामध्ये भर पडण्याची शक्यता आहे. आता आगामी दोन वर्षांत सुमारे 67 हजार 644 कोटी रुपयांची तूट भरपाईपोटी सुमारे 38 टक्के वीजदरवाढ करण्याची याचिका महावितरणने दाखल केली आहे.

यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर या याचिकेला मंजुरी मिळाली तर वीजबिलात प्रतियुनिट 2 रुपये 55 पैशांची वाढ होणार आहे. यामुळे याची झळ सर्वसामान्य लोकांना बसणार आहे. यामुळे आता दरवाढीच्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी ड्युटी रकमेचा अतिरिक्त बोजा ग्राहकांवर पडणार आहे.

दरम्यान, महावितरणच्या दरवाढीच्या मागणीला सर्व वीजग्राहक, शेतकरी, रहिवासी व ग्राहक संघटनांनी विरोध करावा, असे आवाहन महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केले आहे. यामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे.

महावितरणने याचिकेत ही दरवाढ स्थिर वा मागणी आकार, वीज आकार व वहन आकार या तिन्ही आकारात वाढ करण्याची मागणी केली. महावितरणकडून करण्यात आलेल्या अशा रेकॉर्डब्रेक दरवाढीची मागणी आयोग स्थापन झाल्यापासून प्रथमच करण्यात आलेली आहे.

दरम्यान, महिन्याला देशात सर्वाधिक दर असूनही इतकी प्रचंड मागणी राज्यातील सर्व वीज ग्राहकांना शॉक देणारी आहे, तसेच यामुळे कंपन्या देखील बाहेर जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!