जितेंद्र आव्हाड यांचे धीरेंद्र महाराज यांना ‘दिसेल तिथे ठोकण्याचे आदेश’ संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाने आक्रमक…!

मुंबई : बागेश्वर धामचे वादग्रस्त धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर टीका होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी “हा दिसेल तिथे बडवा.. आणि म्हणा ज्ञानदेव-तुकाराम” अशी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
“असल्या नकलाकार बाबांनी आमच्या महापुरुषांच्या बाबतीत तोडलेले अकलेचे तारे बघितल्यावर तुकोबारायांच्या शब्दातच सांगायचं म्हटल तर, “तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा”ही उक्ती योग्यच वाटते. अन व्यावहारिक भाषेत बोलायचं म्हटल तर, “जोड्याने मारल पाहिजे याला” असं ट्विटर जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
“बागेश्वर बाबाला दिसेल तिथे ठोका; नाजूक भागांवर फटके दिले तर तोंड बंद होईल” धीरेंद्र शास्त्री सारखी कोल्हेकुई जेव्हा सुरू असते, त्यावर तुकोबांनी सांगितलं आहे. ”अवघे कोलियाचे वर्म अंडी घातलिया, तोंडी खीळ पडे” अशा बदमाशांच्या नाजूक भागावर हल्ला केला तर यांचं थोबाड बंद होतं. त्यामुळे वारकरी सांप्रदायाला आणि त्याचा अधिष्ठानाला जर असा पापी आणि बेअक्कल असलेला महाराज काही बोलत असेल, तर मला असं वाटतं की वारकरी सांप्रदायाने याची गंभीर दखल घ्यावी. हा जिथे दिसेल, तिथे याला ठोकून काढा” अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे.