इस्त्री करत असताना ४ वर्षीय चिमुकल्याचा करंट लागल्याने जागीच मृत्यू, पेठ गावात घडली दुर्दैवी घटना..!!


उरुळी कांचन : घरामध्ये इस्त्री करत असताना एका ४ वर्षीय चिमुकल्याचा वायरचा करंट लागल्याने जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पेठ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता. १२) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने नायगाव पेठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिवराज अजय आढाव (वय 4, रा. पेठ, ता. हवेली) असे या चिमुकल्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरामध्ये इस्त्री करण्याचे काम सुरु होते. यावेळी शिवराज हा घरात खेळत असताना त्याचा इस्त्रीच्या वायरला पाय लागला. या घटनेत त्याला जोरदार धक्का बसला. विजेच्या झटक्याने बेशुद्ध झालेल्या शिवराज याला उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले.

दरम्यान, डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 4 वर्षीय शिवराजच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. येथील उद्योजक राजेंद्र आढाव यांचा शिवराज हा पुतण्या होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!