एका १७ वर्षीय बालकामगाराचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू; पुण्यातील घटना..


पुणे : एका १७ वर्षीय बालकामगाराचा फ्रीजजवळ विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी मधील तळेवडे येथून समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

एका १७ वर्षीय बालकामगाराचा मृत्यू झाला आहे. मृत मुलाचे वडील प्रेमकुमार बनसोडे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चिखली पोलिस स्टेशन मध्ये गणेश जगताप या दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश यांनी १७ वर्षीय मुलाला म्हणजेच बालकामगाराला कामावर ठेवले होते. दुकानात फ्रीजच्या बॉडीमधून करंट जात असल्याचे गणेशला ठाऊक होते. त्याने कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नाही त्यामुळे हा करंट लागल्याचा दावा करण्यात आला आहे.

गणेश जगतापने फ्रीजच्या दुरूस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकार एका मुलाच्या जीवावर बेतला आहे. त्यांच्या मुलाला फ्रीजवर चढून कप काढायला सांगितले आणि हा अनर्थ घडून आला. मुलाला फ्रीजवर चढताच करंट लागला आणि त्यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, मृत मुलाचे वडील बनसोडे यांनी पोलिसात फिर्याद दिली असून गणेश जगताप या दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक गणेश खारगे या प्रकरणामध्ये तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!