Odisha Accident News : भाविकांवर काळाने मारली झडप, भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू, तर ७ जखमी..


Odisha Accident News : गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. ओडिशाच्या क्योंझर जिल्ह्यातील NH 20 वरती झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

आज शुक्रवारी (ता.१) डिसेंबर) सकाळी हा अपघात झाला. सर्व मृत गंजम येथील दिगापहांडी येथील रहिवासी होते. प्रवाशांनी भरलेली व्हॅन मंदिराकडे जात असतानाच हा भीषण अपघात झाला आहे. Odisha Accident News

या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

यानंतर जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला जखमींना घाटगाव रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र नंतर पुढील उपचारासाठी त्यांनाकटकच्या एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये व्हॅनचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही आता या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!