कोल्हापूरच्या’ महादेवी ‘ हत्तीणीच्या घरवापसीत अडथळा ; काय आहे कारण?


कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठाची महाराणी उर्फ माधुरी हत्तीणी ही चर्चेचा विषय बनली होती. या हत्तीणीच्या घरवापसीबाबत मुंबईत बैठका सुरू असताना पेटाने लेटर बॉम्ब टाकून महादेवीच्या आरोग्याबाबत प्रश्न निर्माण केला आहे. पेटाने सोशल मीडियावर महादेवी हत्ती संवर्धन केंद्रात योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. तसेच महादेवीला पुन्हा साखळदंडाने बांधलेल योग्य नाही असेही नमूद केल आहे.यामुळे महादेवीचा नांदणी प्रवास पुन्हा लांबण्याची चिन्हे दिसत आहेत.

पेटा इंडियाने महादेवी हत्तीणीच्या बाबतीत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशास पेटाने पाठीबा दर्शवला आहे. या आदेशात माधुरीच्या आरोग्य यास प्राधान्य देण्याची निर्देश देण्यात आले होते. मानवाप्रमाणेच हत्तीसाठी देखील रुग्णसेवा,विशेष उपचार व निवृत्ती आवश्यक असल्याचे पेटाने स्पष्ट केला आहे. त्यामुळे आता घर वापसीबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे.

दरम्यान याआधी वनताराचे साईओ विहान कर्णीक आणि नांदणी मठाचे मठाधिपती यांची बैठक पार पडली. या बैठकीत महादेवी हत्तीणीला परत कोल्हापुरात नांदणी मठात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या महादेवी हत्तीणी साठी वनताराने विशेष केंद्र उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.वनताराने कोल्हापुरातच एक अत्याधुनिक पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. हे केंद्र हायड्रोथेरपी, लेझर थेरपी आणि २४ तास पशुवैद्यकीय सुविधा यांसारख्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त असेल. यामुळे माधुरीला उत्तम वैद्यकीय सेवा मिळेल आणि कोल्हापूरकरांच्या भावनांचाही आदर राखला जाईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!