पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली अश्लील प्रकार ; पोलिसांनी सापळा रचला अन्….

पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना समोर येत आहेत. अशातच आता पुण्यात ‘थाई स्पा’च्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सापळा रचून विमानतळ पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,विमाननगर येथील दत्त मंदिर चौक परिसरात असलेल्या गुलमोहर रेजन्सी इमारतीमधील सिग्नेचर थाई स्पा येथे, स्पा सेंटरमध्ये मसाजच्या आडून सेक्स रॅकेट सुरू असल्याच्या घटना आणि तक्रारी वारंवार समोर येत होत्या. या तक्रारीचा मागोवा घेत पोलिसांनी सापळा रचला.तेव्हा स्पा सेंटरमध्ये पाच तरुणी वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या.यातील मुख्य आरोपी मेहबूब खान लष्कर (वय २८, रा. आसाम) याला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.अधिक चौकशीत आरोपी मेहबूब खान याने या तरुणींना जास्त पैशांचे आमिष दाखवून स्पाच्या नावाखाली देहव्यापारात ढकलल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईदरम्यान ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांतून आरोपी स्वतःची उपजीविका करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे.
