ओबीसी , अर्थिक दृष्ट्या मागास मुलींना शंभर टक्के आरक्षण ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय..!!


Eknath Shinde । महाराष्ट्रातील ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलींसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलींना 100 टक्के फी माफीची शिफारस चंद्रकांत पाटील करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तसा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश चंद्रकांत पाटील यांना दिले आहेत. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी याबाबत शिफारशी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर 642 अभ्यासक्रमांसाठी 1 हजार कोटींहून अधिक रकमेची तरतूद करावी लागणार असल्याचे समोर आले आहे.

नुकताच महाराष्ट्रातील एका मुलीने मोठा निर्णय घेतला होता. फीसाठी पैसे नसल्यामुळे या मुलीने आयुष्य संपवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. तिने सुसाईड नोट लिहून ठेवली होती की, “माझ्या फीपैकी 50 टक्के सरकार भरत आहे. यासाठी मी सरकारचे आभार मानते, परंतु माझ्या पालकांकडे उर्वरित 50 टक्के फी भरण्यासाठी पैसे नाहीत.” या घटनेने मुख्यमंत्र्यांचे मन हेलावले होते. या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलींसाठी 100 टक्के फी माफी प्रस्तावित करण्यास सांगितले आहे. लवकरच हा प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!