आता 1 तासात भीमाशंकर ते राजगुरुनगर प्रवास होणार! नवीन महामार्ग होणार विकसित, पुणे जिल्ह्यातील पाच गावांमध्ये जमिनीचे संपादन..

पुणे : पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरला अनेक भाविक येत असतात. यामुळे या ठिकाणी सुख सोयी निर्माण करण्यास सरकारचे प्राधान्य आहे. आता खेड तालुक्यातील भीमाशंकर-तळेघर-वाडा ते राजगुरूनगर रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 60 या सिमेंट काँक्रिट द्रुपदरीकरण प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून, या प्रकल्पाची राजपत्रामध्ये प्रसिद्धी करण्यात आले आहे.
खेड तालुक्यातील विविध गावांमधून हा रस्ता जात असल्यानं, जमिनींचं संपादन होणार आहे. रस्त्याचे प्रकल्प कार्य पूर्ण झाल्यानंतर खेडच्या पश्चिम भागाचा मोठा विकास होण्याची शक्यता आहे. या रस्त्यामुळे राजगुरूनगर आणि भीमाशंकर यांच्यातील अंतर कमी होईल आणि त्यासाठी प्रवासाचा वेळ कमी होईल. या प्रकल्पामुळे खेड तालुक्यातील 25 गावांतून हा मार्ग जाईल, ज्यामुळे या भागाचा समृद्धीचा मार्ग खुला होईल.
हा रस्ता 60.25 किलोमीटर लांबीचा होईल आणि 87 हेक्टर 3668 आर क्षेत्र जमीन संपादित केली जाईल. भीमाशंकरचे प्रमुख धार्मिक महत्त्व आहे, त्यामुळे त्याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल, त्याचबरोबर रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. यामुळे या महामार्गाचे अनेक फायदे आहेत.
या मार्गावर जमिनीचे संपादन करण्यात आंबेगाव तालुक्यातील एक गाव 2 हेक्टर 4436 आर क्षेत्रासाठी संपादन करण्यात येईल. खेड तालुक्यातील कारकुडी, खरोशी आव्हाट, वाडा, तिफनवाडी, धुवोली, शिरगाव, टोकावडे, कडधे, कान्हेवाडी बुद्रुक, मोहकल, कमान, चास, आखरवाडी, पांगरी पाडळी, सातकरस्थळ, चांडोली तर्फे खेड, वडगाव न. खेड, दरकवाडी वाळद, डेहणे, बुरसेवाडी, गुंडाळवाडी, वांजळे या गावांमधून हा रस्ता जाईल
याठिकाणी देखील जमिनींचं संपादन होईल. राष्ट्रीय महामार्ग अधीनियमानुसार संपादन केले जाणार आहे. उपअधीक्षक भूमी अभीलेख खेड यांच्या कडे 22 गावांचा संयुक्त मोजणी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे आणि डार्फ्ट 3 नोटीफिकेशनचे मसुद्याबाबत कार्यवाही सुरू आहे. सरकारच्या या प्रकल्पामुळे खेड आणि आंबेगाव तालुक्यातील गावे समृद्ध होऊन, राष्ट्रीय महामार्ग क्र. 60 चा विस्तार लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी आशा आहे.
या रस्त्याच्या विकासामुळे पुणे जिल्ह्याच्या इतर भागांमध्येही मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सामाजिक विकास होण्याची शक्यता आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी सरकार आणि संबंधित विभागांनी सर्व आवश्यक मापदंड पूर्ण केले आहेत, जेणेकरून हा प्रकल्प वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण होईल, अशी माहिती समोर आली आहे.