आता पुण्यात मिळणार स्वस्तात मस्त घर! म्हाडातर्फे 4186 घरांसाठी बंपर लॉटरी, जाणून घ्या….

पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून सव्वाचार हजार घरांची सोडत येत्या चार ते पाच दिवसांमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आचारसंहिता
लागल्यास परवानगी घेऊन सोडत जाहीर करू. यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बोलवण्यात येणार आहे.
याबाबत ‘म्हाडा’चे अध्यक्ष
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. अर्ज व अनामत रक्कम स्वीकृती ११ सप्टेंबरपासून सुरू झाली असून, अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर ठेवण्यात आली होती. नागरिकांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता व इतर कारणांमुळे अर्ज करण्यासाठी दोनदा मुदतवाढ दिली होती, अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे.
नंतर ही मुदत ३० नोव्हेंबर केली. या सोडतीला तब्बल दोन लाख १५ हजार अर्ज आले आहेत. त्याची पडताळणी सुरू आहे. त्यामुळे सोडतीला विलंब झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सोडतीसाठी दोन लाख १५ हजार ८४७ अर्ज आले आहेत. यामुळे मोठी संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये प्रत्येक अर्जासाठी ७०८ रुपये शुल्क आणि २० हजार अनामत रक्कम ठेवण्यात आली होती.

अर्जदारांनी ४४६ कोटी ९७ लाख ५९ हजार ६७६ रुपये म्हाडाकडे जमा केले आहेत. अर्जांची संख्या जास्त असल्यानेही सोडत काढण्यास विलंब झाला आहे. ही पडताळणी शनिवारपर्यंत सुरू राहील. त्यानंतर सोडत काढण्यासाठी साधारण १६ किंवा १७ डिसेंबरची तारीख निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती आढळराव यांनी दिली आहे.

दरम्यान, आता लवकरच आचार संहिता लागणार आहे. यामुळे काही अडचण आल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घेऊ असेही ते म्हणाले. यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बोलणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
