आता पुणे, मुंबई , नागपूरसाठी वंदे भारत स्लीपर सुरू होणार, प्रस्तावही सादर, जाणून घ्या…


पुणे : गेल्या काही दिवसांपासून नागपूर, पुणे आणि मुंबई या मार्गावर स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या विभागाने रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे. यामुळे याबाबत येत्या काही दिवसात निर्णय होऊ शकतो. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासासाठी देशभरात सर्वत्र या गाडीची मागणी आहे. यामुळे या गाडीची मागणी केली जात आहे. यामुळे हा प्रस्ताव कधी मंजूर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पाच ते सात तासांच्या प्रवासाकरिता वंदे भारत आहे.

तसेच त्यापेक्षा अधिक लांबच्या प्रवासासाठी स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस येणार आहे. नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई यादरम्यान स्लीपर वंदे भारत सुरू करावी, असा प्रस्ताव नागपूर विभागाने रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे. असे झाले तर अजून प्रवासी वाढणार आहेत.

या गाडीच्या डब्यांची निर्मिती होत आहे. वंदे भारतच्या नवीन गाडय़ा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाचा असतो, असे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे नवनियुक्त विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी सांगितले. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत विचार केला जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!