कर्जमाफीसाठी आता राज्यात पेटणार मशाल! शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूंचा मोठा निर्णय…


नाशिक : राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाला न जागता शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली नाही. यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे आता शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू पुन्हा सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. कर्जमाफीसाठी ते आता मशाल आंदोलन करणार आहेत. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बच्चू कडू हे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिक मधील निवास्थानासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहे. तसेच राज्यभरातील प्रहारचे कार्यकर्ते सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहे. सरकारने निवडणुकीमध्ये शेतकर्‍यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, परंतु शेतकर्‍यांची कर्जमाफी केली नाही.

त्यामुळे बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. ते म्हणाले, कर्जमाफीला सरकारकडे पैसे नाही, अपंगांना द्यायला पैसे नाही असे सरकार म्हणते. सरकारच्या धोरणामुळे शेतकर्‍यांचं नुकसान होत आहे. भगवा झेंडा घेऊन आणि रामचंद्राची शपथ घेऊन तुम्ही कर्जमाफी करणार म्हणून सांगितलं होत.

रामचंद्राला तर तुम्ही बेमान झालेच पण जनतेसोबत देखील बेमान झाले. प्रभू रामचंद्राची शपथ ही बेइमानी आम्ही उकडून काढू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. शेतकर्‍यांच्या पालकत्व ज्यांच्याकडे आहे ती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले. हातात मशाल, गळ्यात निळा दुपट्टा आणि भगवा झेंडा घेऊन आम्ही आंदोलन करू असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच माणिकराव कोकाटे तुम्ही कृषिमंत्री आहात तुम्ही शेतकर्‍यांचे पालक आहेत. मी त्यातला नाही असं म्हणून जर तुम्ही जबाबदारी झटकत असाल तर गाठ प्रहारशी आहे, असेही ते म्हणाले. प्रहार संघटनेच्या माध्यमातून कडू अनेकदा भूमिका घेताना दिसतात. सध्या त्यांनी कर्जमाफीसाठी एल्गार पुकारला आहे. त्यांच्या या आंदोलनाची राज्यभरात चर्चा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!