सर्वसामान्यांना मोठा दिलासा! आता रेशनकार्ड काढता येणार ऑनलाइन, एजंटची कटकट मिटली

मुंबई : रेशनकार्ड काढणे हे सध्या मोठे जिकरीचे काम बनले आहे. अनेकदा फेऱ्या मारा, पैसे द्या यामुळे याचा सर्वसामान्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. असे असताना आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड काढण्याचा निर्णय घेतला आहे.

हे रेशन कार्ड आपण घरबसल्या देखील काढू शकतो. सामान्य नागरिकांना कार्यालयाच्या ज्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्या फेऱ्या न मारता आता ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड काढू शकतो. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
यामुळे तुम्ही वेळेची बचत करू शकता. तसेच हे रेशनकार्ड ऑनलाइन आणि निशुल्क स्वरूपात उपलब्ध होणार आहे. यामुळे सामान्य लोकांचा वेळ वाचला जाणार आहे. यामुळे हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.

सामान्य नागरिकांना रेशन कार्ड 20 रुपयाला मिळायचे ते अधिकाऱ्यांकडून, एजंटकडून फेऱ्या मारून दोन हजार रुपये घेऊन त्या नागरिकांना रेशन कार्ड हे उपलब्ध व्हायचे. यामुळे याचा फटका अनेकांना बसत होत.