आता ‘या’ शहराचं नाव बदलणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय…


मुंबई : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून काल (ता.१८) अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. याचदरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी सांगली जिह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलण्याबाबत घोषणा केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याची घोषणा केली.

भुजबळ म्हणाले की, इस्लामपूरचं नाव बदलण्याची मागणी मागील ४-५ दशकांपासून सुरू होती. आरएसएसचे तत्कालीन स्थानिक प्रमुख पंत सबनीस यांनी सर्वप्रथम ही मागणी केली होती.” एवढंच नव्हे, तर १९८६ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही याच शहरातील सभेत इस्लामपूरला ‘ईश्वरपूर’ असे संबोधले होते.

दरम्यान, राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर निर्णय घेत इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर असं निश्चित केलं आहे. या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून, आता या नावबदलाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक शहरांची नावं बदलण्यात आली आहेत. मराठवाड्यातील औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं नाव धाराशिव आणि नुकतंच अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्यात आलं आहे.

राज्यातील अहमदनगर (अहिल्यानगर) , उस्मानाबाद (धाराशिव) आणि औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्यांची आणि शहरांची नावे बदण्यात आल्यानंतर आता आणखी एका शहराचे नाव बदलण्यात येणार आहे. याची शासनस्तराव कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असून भाजपनेत्यांनी केलेल्या प्रयत्नांना आता यश येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!