मोठी बातमी! आता राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या २०० रुपयांत होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय..


मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय. आता शेतीची, जमीनीच्या हिस्सेवाटप मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली असून आता राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या २०० रुपयांमध्ये होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार आहे. हिस्सेवाटप प्रक्रियेत अनेक वेळा एकत्र कुटुंबातील सदस्यांना आपापला हिस्सा स्पष्ट करून घेण्यासाठी सरकारी कार्यालयांचा धावपळ करावी लागते.

दरम्यान, यासाठी मोजणी हवी असते आणि याआधी त्यासाठी प्रति हिस्सा १००० ते ४००० रुपये शुल्क आकारले जात होते. ही रक्कम आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा बोजा ठरत होती. आता केवळ २०० रुपये भरून शेतकऱ्यांना नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशे मिळणार आहेत.

       

राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये शेती ही एकमेव उत्पन्नाचा स्रोत आहे. हिस्सेवाटपाच्या प्रक्रियेसाठी भरावा लागणारा जास्तीचा मोजणी शुल्क हा अनेक कुटुंबांमध्ये तणावाचा विषय ठरत होता. ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने मोजणी शुल्क फक्त २०० रुपये इतके मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रक्रियेत भाग घेणाऱ्या नागरिकांना मोजणी केल्यानंतर अधिकृतरित्या नोंदणीकृत वाटणीपत्र दिले जाईल. यासोबतच, त्यांच्या जमिनीचे नकाशे सुद्धा मिळतील, जे त्यांच्या हक्काचे अधिकृत पुरावे असतील. यामुळे भविष्यात कोणतेही मालमत्तेसंबंधी विवाद निर्माण होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!