शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी! आता शेततळ्यासाठी अर्ज सुरु, जाणून घ्या कुठे आणि कसा करायचा अर्ज…


पुणे : शेतकऱ्यांना आता वैयक्तिक शेततळ्यासाठी अनुदानाचा अर्ज करता येणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्रसरकारच्या संकेतस्थळावर अर्ज पुन्हा सुरू झालेले असून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करावा असे आवाहन कृषी विभागांमार्फत करण्यात आले आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावर शेततळ्यासाठी पुन्हा अर्ज सुरू झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करून शेततळ्याचा लाभ घ्यावा असे आव्हान देखील कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

राज्यात बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रश्न हा कायम असतो. कोरडवाहू तसेच खडकाळ जमीन अशा ठिकाणी शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता नसते त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर उपलब्ध राहावे लागते.

शेतकऱ्यांना सिंचनाची सोय निर्माण करून देणारी शेततळे योजनेमधून शेतकऱ्यांना अनुदान मिळते. यासाठी राज्य शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असते.

किती मिळते अनुदान?

वैयक्तिक शेततळे तसेच सिंचन साधने व उपकरणांसाठी शेततळ्याच्या आकारमानावरून अनुदान ठरवले जाते. ही रक्कम पूर्वी पन्नास हजार एवढी होती. यावर्षी या अनुदानामध्ये वाढ झाली असून ही रक्कम आता ७५ हजार रुपये करण्यात आली आहे.

आवश्यक कागदपत्रे..

जमिनीचा सातबारा आणि ८ अ उतारा
आधार कार्ड झेरॉक्स
बँक पासबुक झेरॉक्स
हमीपत्र आणि जातीचा दाखला

योजनेसाठी पात्रता काय?

जर तुम्हाला शेततळे बांधायचे असेल तर त्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. ज्या जमिनीवर शेततळे बांधायचे आहे ती जमीन तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे गरजेचे आहे.

शेततळे योजनेसाठी अर्जदार शेतकऱ्याने मागेल त्याला शेततळे सामूहिक शेततळे किंवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेच्या माध्यमातून शेततळ्यासाठी कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

या ठिकाणी करा अर्ज?

तुम्हाला जर शेततळ्यासाठी अर्ज करायचा असेल तर राज्य सरकारच्या महाडीबीटी संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल. शेततळे योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!