जगात भारी नरेंद्र मोदी !आता लोकप्रियतेच्या बाबतीत बायडन, सूनक यांनाही टाकले मागे…!


नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डंका हा जगभर पसरला आहे. त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जवळपास नऊ वर्षे सत्तेत असूनही नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झालेली नाही.

असे असताना आता मोदी हे केवळ भारतातच नाही तर जगभरात लोकप्रिय आहेत, असा अहवाल जागतिक बिझनेस इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने दिला आहे. यामुळे आता मोदींनी दिग्गजांना मागे टाकले आहे.

मोदींनी लोकप्रियतेच्या बाबतीत 22 देशांच्या जागतिक नेत्यांना मागे टाकले आहे. यामध्ये जगातील बड्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, युनायटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचाही समावेश आहे.

यामुळे आता मोदी हे जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती झाले आहेत. मॉर्निंग कन्सल्ट या बिझनेस इंटेलिजन्स कंपनीने २६ ते ३१ जानेवारी दरम्यान हे सर्वेक्षण केले आहे. यामुळे भारतीयांसाठी ही एक आनंदाची बाब आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!