आता गौतमी पाटीलसाठी खासदार अमोल कोल्हे मैदानात, म्हणाले, दोन वेळचे जेवण…
पुणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारी गौतमी पाटील सध्या अनेक कारणाने सतत चर्चेत येत आहे. तिच्या आडनावावरून देखील तिला ट्रोल केले जात आहे. यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
ते म्हणाले की, गौतमीला यशाची फिज आहे, ती पचवण्यासाठी समाजाने तिला मदत करावी. तिचे वय खूप लहान आहे. ग्रामीण भागातील तरुण आज तिच्यावर फिदा झाले आहेत.
चेन्नई सुपर किंगने कोरले IPL वर आपले नाव, शेटवच्या बॉलवर जिंकला सामना..
तिच्या कार्यक्रमांना प्रंचड गर्दी होतेय. परंतु ज्यावेळी गौतमी परिस्थीत हलाखीची होती तेव्हा दोन वेळचे जेवण द्यायला यातला कोणी गेलं नाही. आज ती तिच्या कर्तुत्वावर आणि कलेवर पुढे जाते तेव्हा कोणाच्या पोटात दुखण्याची काय कारण आहे? असा प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केला.
पुणे हादरले! भाजी कापण्याच्या चाकूने सपासप वार; प्रेयसीकडून प्रियकराची निर्घृण हत्या
सुरुवातीच्या काळात गौतमीच्या कार्यक्रमांवर विशेषत: तिच्या डान्सवर आक्षेप घेण्यात आला होता. गौतमी अश्लील अदा करत असल्याची टीका झाली होती. त्यावेळी तिने स्वत:हून माफीही मागितली होती. त्यानंतर तिने अश्लील हावभाव वाटणाऱ्या स्टेप्स करणं टाळण्यास सुरुवात केली.
दोन हजारांची नोट चलनात आणणे व परत घेण्याचा निर्णय मुर्खपणाचा; पी. चिदंबरम यांची सरकारवर टीका
गौतमी पाटील यशाच्या शिखरावर आहे. कलाकार म्हणून ती तिची कला सादर करत आहे. तो तिचा व्यवसाय आहे. यामुळे तिला अकारण ट्रोल करण्यापेक्षा तिची कुचंबणा होऊ नये, अशी काळजी घ्या, असे आवाहन अमोल कोल्हे यांनी केले.