आता ‘या’ लोकांना मिळणार नाही मोफत रेशन, सरकारचा मोठा निर्णय…!
मुंबई : मोफत रेशनद्वारे देशातील गरीब लोकांना धान्य दिले जाते. देशातील करोडो लोक सरकारच्या या योजनेचा लाभ घेत आहेत. असे असताना सरकार आता काही लाभ घेत असणाऱ्या काही कडक नागरिकांवर कारवाई करत आहेत.
याचे कारण ते पात्र नसूनही मोफत रेशनचा लाभ घेत आहेत. अपात्र लोक या योजनेचा लाभ घेत असल्याने पात्र असणाऱ्या नागरिकांना मोफत रेशन मिळत नाही. सध्या अपात्रांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
भारतातील सर्वात मोठे राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत एकूण 10 लाख लोकांची ओळख पटली आहे, जे अपात्र असून मोफत रेशनचा लाभ घेत आहेत. आता सरकार अशा लोकांवर कारवाई करत आहे.
सर्व देशात आता अशीच कारवाई होणार आहे. एकही पात्र व्यक्ती मोफत रेशनपासून वंचित राहू नये म्हणून अपात्र लोकांना रेशनचे वितरण बंद करण्याची सरकारची योजना आहे. तसेच, नवीन मानक लागू झाले की फक्त पात्र व्यक्तींनाच याचा फायदा मिळणार आहे.
Do not give free ration give them work,if you give ration they sale them in to the market or use in poli bhji Kendra,or they do not use for personal use.