आता एक्स्प्रेस पकडण्यासाठी पुणे स्थानकात जायची गरज नाही, आता ‘या’ स्टेशनवर ४ एक्स्प्रेस थांबणार…!
पुणे : सध्या पुणे रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर गाड्या येत असल्याने प्रशासनावर मोठा ताण निर्माण होत आहे. यामुळे आता हडपसर रेल्वे टर्मिनलवर लवकरच ‘हुतात्मा एक्स्प्रेस’सह चार ‘एक्स्प्रेस’ गाड्यांना थांबा देण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने बोर्डाकडे पाठविला आहे.
याला मान्यता मिळाल्यास चार मेल ‘एक्स्प्रेस’मधून प्रवास करणाऱ्या हडपसर व परिसरातील नागरिकांना पुणे स्टेशनपर्यंत यावे लागणार नाही. यामुळे स्टेशनवरील ताण कमी होणार आहे.
यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हडपसरमधून सोलापूर पुणे, दौंड डेमू या दोन नव्या गाड्या सोडण्यास सुरवात झाली आहे. आधीची हैदराबाद एक्सप्रेस देखील हडपसर येथून सुरू आहे.
असे असताना आता रेल्वे प्रशासनाकडून हडपसर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्सप्रेससह चार मेल एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हडपसर रेल्वे टर्मिनलवर तीन प्लॅटफॉर्म असल्यामुळे या गाड्यांना थांबा मिळण्यास काहीच अडचण येणार नाही. त्यामुळे पुणे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच या परिसरातून येणाऱ्या नागरिकांची सोय देखील होणार आहे.
हा प्रस्ताव त्वरित मागे घ्यावा कारण पुणे स्टेशन पासून हडपसरला स्टेशनला जाण्यासाठी कुठलीही वाहतुकीची सोय नाही त्यामुळे अपडाऊन करणाऱ्या प्रवासाना खूपच त्रास होत आहे