नोव्हेंबर महिना संपला! लाडक्या बहिणींना हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती आली समोर…


पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

मात्र नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने राज्यातील लाखो लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. नोव्हेंबर संपल्यानंतरही खात्यात पैसे न आल्याने अनेकांनी शासनाकडे अपडेटची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे. शासनाकडून केवायसी प्रक्रियेसाठी दिलेल्या अंतिम मुदतीत अलीकडेच बदल करण्यात आला आहे. अनेक महिलांची ई-केवायसी वेळेत पूर्ण न झाल्याने मोठ्या प्रमाणात मुदतवाढीची मागणी होत होती.

यानुसार राज्य सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत केवायसीची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबरमध्ये जमा करण्यात आला होता.

       

त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये येईल, अशी अपेक्षा होती. पण राज्यात सध्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने हप्त्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, २ डिसेंबरला मतदान होणार असून, ३ डिसेंबरला मतमोजणी पूर्ण होईल. आचारसंहिता निवडणूक निकालांसोबत शिथिल झाल्यानंतरच आर्थिक व्यवहार सुरू होऊ शकतात. त्यामुळे ४ डिसेंबरनंतर नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!