कुख्यात गुंड निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या ; पुणे पोलिसांनी उचललं थेट मोठं पाऊल…


पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेल्यानंतर मोठी खळबळ उडाली. यामुळे राजकारण चांगलंच तापलं असून पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर ही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. आता पुणे पोलिसांनी घेतलेल्या निर्णयामुळे निलेश घायवळच्या भोवतीचा कारवाईचा फास आणखी आवळला जाणार आहे.घायवळचा 2021 मधील मकोकाच्या गुन्ह्यातील जामीन रद्द व्हावा, यासाठी कोथरूड पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे निलेश घायवळच्या अडचणींमध्ये आणखीनच वाढ होणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, निलेश घायवळ याच्यावर आतापर्यंत दहा वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून आता कोथरूड पोलिसांनी थेट त्याच्या जुन्या एका केसमधील जामीन रद्द व्हावा यासाठी अर्ज दाखल केल्यामुळे निलेश घायवळच्या अडचणीत वाढ झाली आहे.

निलेश घायवळवर दाखल असलेले गुन्हे

       

१. कोथरूड गोळीबार प्रकरण

२. कोयत्याने हल्ला केल्या प्रकरणी

३. घरावर छापेमारी करण्यात आली त्यावेळी घायवळ याच्या घरी जिवंत काडतुसे सापडले होते

४. बनावट नंबर प्लेट

५. पासपोर्ट बनवण्यासाठी खोटी कागदपत्रे दिली

६. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांनी १० फ्लॅट नावावर करून घेत खंडणी मागितली

७. सिम कार्ड दुसऱ्याच्या नावाने वापरले

८. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रील्स बनवल्या प्रकरणी

९. घायवळचा साथीदार मुसा शेख गांजा तस्करी प्रकरण

१०. एका कंपनी कडून ४५ लाख रुपयांची खंडणी वसूली प्रकरणी

दरम्यान २०२१ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात घायवळ याला २०२२ मध्ये जामीन अर्ज मंजूर झाला होता. उच्च न्यायालयाने निलेश घायवळ याला कंडिशनल बेल दिली होती. मात्र, यामध्ये असलेल्या अटी शर्तीचे पालन न केल्यामुळे त्याचा अर्ज रद्द व्हावा, अशी मागणी करत पोलिसांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!